भा ज प ने पत्रकारांची प्रतिमा “धाब्या”वर बसविली
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केन्द्रात भा ज प सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत यामुळे पत्रकारांची प्रतिमा भाजपाने चक्क धाब्यावर बसविली आहे असा आरोप काँग्रेस नेते तथा प्रवक्ते माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केली आहे.
गाडगीळ यांनी यासाठी एक यादीच जारी केली आहे.
१) भा ज प ला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टी व्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजीनामे घेण्यात आले . २) संसद भवनात पत्रकार गॅलरी शिवाय ईतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ३) संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती नंतर, पूर्वी विशेष पास दिला जायचा तोही बंद केला . ४) निर्भिडपणा दाखविणार्या चॅनेलची मालकीच बदलण्यात आली. ५) आता तर राज्यातील भा ज प च्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार “ धाब्यावर बसवली आहे . हेच कॅांग्रेसच्या राजवटीत झाले असते तर अग्रलेख आणि रकाने यांनी पेपर भरून गेले असते असे गाडगीळ यांनी म्हटले आहे.
एवढे सारे होउनही पत्रकार गप्प का ? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला असे प्रश्न आज कॅांग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केले आहेत
ML/KA/SL
26 Sept. 2023