भाजपकडून मुंबईत मराठी दांडीयाचे आयोजन

मुंबई, दि. १३ : काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाजपने यंदाही मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन केलं आहे.. मराठी बहुल भागात मराठी दांडियाचं आयोजन करून भाजपने मराठी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानात सलग चौथ्या वर्षी मराठी दांडिया आयोजित केला आहे.
27 सप्टेंबर ते 1ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी 7 वाजता दांडिया रंगणार आहे .सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचे या दांडियात सादरीकरण असेल. मराठी सिनेसृष्टीतील व बॉलीवूडमधील कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थिती असेल. या दांडियात प्रवेश निःशुल्क असेल. रोज मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्या तिघांना आयफोन दिले जातील…यंदाची दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ अशी आहे. दरम्यान यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवरात्रोत्सवाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे.