भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

 भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वाशिम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ५९ वर्षी निधन झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतू मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.

ML/KA/SL

23 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *