भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

 भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेली अनेक दिवस त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर आज त्यांनी पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी पुणे शहराचं महापौरपद भूषवलं.

सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या. पुणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.

त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ९.०० ते ११.०० केसरी वाडा राहत्याघरी  अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशामभुमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

SL/KA/SL

22 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *