मतमोजणीच्या प्राथमिक फेऱ्यात हरियाणात भाजपची मुसंडी, कॉंग्रेसची पिछेहाट

हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.येथे काँग्रेसचाच विजय होईल, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल,असे सांगितले होते. मात्र आता मतमोजणीत प्राथमिक फेऱ्यात मोटा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा ४६ असल्यामुळे भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थांबविला आहे. काँग्रेस केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.