अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप करतेय धार्मिक ध्रुवीकरण

 अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप करतेय धार्मिक ध्रुवीकरण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अच्छे दिन च्या नावाखाली भाजप ने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, मृत्यू आणि द्वेषाचे व्यापारी यांनी जातीय संहाराचे 2002 चे गुजरात नरसंहार मॉडेल ज्याने भाजपा-आरएसएस ला केंद्रात सत्तेत बसवले तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे.

मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. जसे की राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे इत्यादी.

द्वेष आणि जातीवादाची जी दुकान आहे आणि त्या व्यापाराचा जो सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतो त्यांना मी सांगू इच्छितो की 2002 गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिले होते ते जाता जाता खरे करू नका. एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे,असे ही ऍड .आंबेडकर म्हणाले.BJP is doing religious polarization in the name of Achhe Dina

ML/KA/PGB
31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *