भाजपच्या नगरसेविका रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर

 भाजपच्या नगरसेविका रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर

मुंबई दि ७ : मुंबईच्या महापौरपदाचा संभ्रम संपला असून भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या नावाची अधिकृतपणे घोषणा केली त्यानंतर तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या निवडीमुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. तर मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडींची वर्णी लागली आहे. घाडी हे सव्वा वर्षांसाठी उपमहापौर असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेक नावे चर्चेत होती, मात्र आज भाजपाच्या रितू तावडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *