ठाण्यात भाजपचे बुथ विजय अभियान
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. बुथवर ३७० मते मिळवण्यासाठी आजपासून पुढील सहा दिवस ९ एप्रिल पर्यंत बुथ विजय अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे मुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रथमच प्रत्येक बुथवर पन्नाप्रमुख यांचे मेळावे होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीने केल्याचेही त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला भाजप प्रवक्ते सुजय पतकी,माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, सचिन पाटील, सागर भदे आदी उपस्थित होते.
लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकीत भाजप शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता एकजुटीने उतरला होता. त्यानुसार, प्रत्येक बुथवर गेल्या २०१९ मध्ये मिळालेली मते आणि त्यात ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी लोकांच्या घरापर्यत जाणार असून प्रत्येक लाभार्थी पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आणि घराघरांवर भाजपचा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रथमच प्रत्येक बुथवर पन्नाप्रमुख यांचे मेळावे होणार.महाराष्ट्रात महायुती मार्फत ४८ जागा जिंकण्याचा निर्धारही उपाध्ये यांनी यावेळी बोलून दाखविला.
एखादा निर्णय होईपर्यंत जागेवर हक्क सांगणे स्वाभाविक आहे. प्रत्येक टप्यानिहाय उमेदवार जाहीर होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील उमेदवारही लवकरच जाहीर होतील. १० वर्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटीबद्ध आहे. आमची मने जुळली, मते जुळली आहेत. फक्त उमेदवार जाहीर झाला की महायुती म्हणून ताकदीने लढणार आहोत. एखाद दुसरा स्थानिक अपवाद वगळता महायुती मध्ये सर्व काही आलबेल असून याउलट मविआमध्येच फाटाफुट सुरू असल्याचे उपाध्ये म्हणालेBJP booth victory campaign in Thane
ML/ML/PGB
3 Apr 2024