दिल्लीत भाजप-आप एकत्र,आमदारांच्या पगारवाढीसंदर्भात चर्चा

नवी दिल्ली, दि. २8 : दिल्लीतील आमदारांच्या पगार वाढी बाबत विधान सभेत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवायाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. दिल्ली विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभापती विरेंदर गुप्ता यांनी आमदारांचे वेतन, भत्ते आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आणि योग्य शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या माध्यमातून आमदारांचा पगार आणि सध्याच्या स्थितीचे परीक्षण केले जाणार आहे. तसेच, आमदारांना सुविधा मिळाव्यात यासाठी त्यामध्ये संभाव्य सुधारणांचा विचार केला जाणार आहे. मार्च २०२३ मध्ये आमदारांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्यात आली. त्यापूर्वी आमदारांना सुमारे ५४ हजार रुपये वेतन मिळत होते. जुलै २०२२ मध्ये दिल्ली विधानसभेत आमदार मंत्री आणि राष्ट्रपतींकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि मार्च २०२३ मध्ये पगारवाढीची अधिसूचना जारी करण्यात आली.
त्यानुसार, सध्या दिल्लीतील आमदारांचे चेतन सुमारे ९० हजार रुपये आहे. मात्र, या वेतनात आता वाढ करण्याची मागणी आमदारांकडून होत असल्याचं समजतय. विशेष म्हणजे या मुद्यावर सताधारी आणि विरोधी आमदार एकत्र असल्याचं पहायला मिळालं.
VB/ML/SL
28 March 2025