भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ३
भाजपा कुलाबा विधानसभेच्या वतीने कफ परेड येथून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ केंद्रप्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनास भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळीभाजपच्या कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आली. तसेच सर्वांना आगामी संघटनात्मक उपक्रमांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. आम्ही नेहमीच कार्यकर्ता प्रति जागरूक असतो. कार्यकर्त्याचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान असतो. आमचा कार्यकर्ता हा पक्षाशी प्रामाणिकपणे काम करून पक्षाला मजबूत करण्याचे काम करत असतो. येणाऱ्या निवडणुकीत देखील पक्षाला बळकट करून निवडून आणण्यासाठी त्यांचे योगदन नक्कीच मोठे असेल अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या कार्यक्रमात दिली.
या कार्यक्रमास भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम, भाजपा मुंबई महामंत्री श्री. गणेश खणकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, माजी नगरसेवक जनक संघवी, माजी नगरसेवक आकाश पुरोहित आणि इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *