आज मुंबई भाजपाचा
विजय संकल्प मेळावा

मुंबई, दि १५
मुंबई भाजपच्या वतीने मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एन एस सी आय डोम , सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्य वक्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असून राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश,राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने या महा विजय संकल्प मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी केले आहे.KK/ML/MS