परळ येथे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषात

मुंबई, दि २१
भाजपा शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक २०३ च्या वतीने ‘सेवालय’ कार्यालयाचा उद्घाटन समारंभ परळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यालयाचे उद्घाटन भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही नेहमी जनसेवेसाठी कार्य करत असतो. या कार्यालयाच्या माध्यमातून पळस एवढी विभागातील अनेक नागरिकांचे समस्या सोडवण्यात येतील. तसेच त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे राहणार. भाजपा महामंत्री सचिन शेट्ये यांचे काम मी अनेक वर्षांपासून पाहत आलो असून त्यांना जनसेवेसाठी शुभेच्छा देतो. हे सेवालय स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि सेवाभावी उपक्रमांचे केंद्रबिंदू करावे अशी अपेक्षा या कार्यक्रमातून व्यक्त करतो अशी माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी या ठिकाणी दिली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी काहीतरी देण्याच्या उद्देशाने अनेक युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान करत या शिबिरात भाग घेतला. आम्ही नेहमीच लोकांसाठी काम करत असून यापुढे देखील या शेवाले कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे समस्या सोडवणार आहे. आपल्या विभागातील कोणत्याही नागरिकांच्या समस्या असतील त्यांनी या ठिकाणी लिखित स्वरूपात आणून द्यावे आहे त्या नक्कीच सोडवण्यात येतील अशी माहिती भाजपा महामंत्री सचिन शेट्ये यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS