भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने अनेक पत्रकारांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ
मुंबई, दि ७
मुंबई- चेंबूर प्रभाग क्र १५२ च्या नगरसेविका तसेच पालिका एम पश्चिमच्या प्रभाग समितीने अध्यक्षा आशाताई मराठे, समाजसेवक सुभाष मराठे आणि श्री रामकृष्ण नेत्रालय ( सुपर स्पेशालिटी आय केअर )यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या शिबिराचा अनेक जणानी लाभ घेतला. हे शिबिर सकाळी १०.३० ते २.०० वाजेपर्यंत सुरू होते.
या शिबिरामध्ये रामकृष्ण नेञालयाचे नेत्ररोग तज्ज्ञांकडून नेञ तपासणी करून डोळ्यांच्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.