भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण होणार? निर्णायक बैठक जवळ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भाजपा विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाने गटनेतेपदासाठी संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून, पक्षाच्या धोरणानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. या निवडीनंतर विधिमंडळामध्ये भाजपाच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे पाऊल उचलले जाईल.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, गटनेतेपदावर कोणाची निवड होईल यावर राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या उत्सुकतेने या निर्णयाची वाट पाहत आहेत.
ML/ML/PGB 3 Dec 2024