बिंदुसरा धरण तिसऱ्यांदा भरले तसेच मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले…

बीड दि १९….गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बीड मधील बिंदुसरा धरण तिसऱ्यानंदा भरले तसेच मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, परळीचे नागापूर धरण ओवर फ्लो तर माजलगावच्या सरस्वती नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे, बीड शहरातील बिंदुसरा धरण या हंगामात तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच, मांजरा प्रकल्प देखील ९३ टक्क्यांपर्यंत भरला आहे. यामुळे, केवळ बीडच नव्हे तर धाराशिव, लातूर आणि बिदर जिल्ह्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची मोठी सोय झाली आहे.
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे, ज्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचून पिकांचे नुकसान झाल्याचीही नोंद आहे. विशेषतः, माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.परळी तालुक्यात देखील अनेक नद्या,नाले ओसंडून वाहत आहेत.ML/ML/MS