बिहारचे मुख्यमंत्री भर कार्यक्रमात विसरले पंतप्रधान मोदींचे नाव

 बिहारचे मुख्यमंत्री भर कार्यक्रमात विसरले पंतप्रधान मोदींचे नाव

रोहतास, दि. ३० : बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार हे रोहतास जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव विसरले. यावेळी पंतप्रधान मोदी स्वतः व्यासपीठावर हजर होते. नीतीश कुमार यांनी मोदींचे नाव घेण्याएवजी पंतप्रधान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा उच्चार केला आणि नंतर लगेच आपल्या चुकीची दुरुस्ती करत पंतप्रधान मोदींची माफी मागीतली. या प्रसंगाच्या व्हायरल झालेल्या ३० सेकंदाच्या व्हिडिओत नीतीश कुमार मोदींसमोर १० वेळा हात जोडताना दिसुन येत आहेत. या प्रसंगानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांना मोदींना “प्रणाम” करण्यास सांगितले.

या घटनेमुळे नितीश कुमार यांच्या सार्वजनिक उपस्थितीतील अलीकडील विसंगतींवर चर्चा वाढली आहे. काही राजकीय विश्लेषक त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्षातील नेते, विशेषतः राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी कुमार यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

तथापि, आपल्या भाषणात कुमार यांनी बिहारमधील विकास कामांबद्दल मोदी सरकारच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि जातनिहाय जनगणनेविषयी माहिती दिली. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापत आहे. सध्या नितीश कुमार यांची जनता दल (यूनायटेड) भाजपसोबत एनडीए आघाडीत आहे. आगामी निवडणुकांमध्ये हा राजकीय समीकरण किती प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी बिहारसाठी 48,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा केली. यात नवीन महामार्ग, रेल्वे प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराचा समावेश आहे. कुमार यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि बिहारच्या प्रगतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.

या संपूर्ण घटनाक्रमामुळे बिहारच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, त्यांच्या भाजपसोबतच्या संबंधांवरही लक्ष केंद्रित होत आहे. बिहारच्या आगामी निवडणुकीत या सर्व घटनांचा प्रभाव कसा पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *