*नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ

पुणे प्रतिनिधी : सुमारे २.५ अब्ज लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली, ५,००० वर्षांपूर्वीची कथा आता नव्या रूपात साकारली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला.
जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटात्मक उपक्रमाच्या निर्मात्यांनी ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ या जागतिक लॉन्चसह रामायणाच्या भव्य विश्वाचा अनावरण केला — ज्यामध्ये पौराणिक काळातील दोन सर्वात प्रतिष्ठित शक्तींमधील शाश्वत युद्धाचा मंच तयार करण्यात आला आहे: राम वि. रावण.
या लॉन्चचा प्रसार संपूर्ण जगभर झाला — भारतातील नऊ शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्स आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये नेत्रदीपक बिलबोर्ड ताबा घेण्यात आला.
दृष्टीकोन असलेले चित्रपट निर्माते आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहनिर्माते म्हणून यश यांच्या सहभागाने, ‘रामायण’ या चित्रपटात ऑस्कर-विजेते तंत्रज्ञ, हॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते आणि भारतातील मोठमोठ्या कलाकारांचा समावेश आहे — हे सर्व मिळून भारतीय संस्कृतीत रुजलेली ही महान गाथा एका आधुनिक सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या स्वरूपात जगासाठी पुन्हा साकारत आहेत.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली, नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओज व आठ वेळा ऑस्कर विजेते DNEG VFX स्टुडिओ, तसेच यश यांच्या Monster Mind Creations यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दसरा भाग दिवाळी २०२७मध्ये IMAX वर प्रदर्शित होणार आहे.
या भव्य प्रकल्पाच्या घोषणेनंतर भारतातील ९ प्रमुख शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्सचे आयोजन करण्यात आले, तर न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर भव्य बिलबोर्ड्सद्वारे जागतिक स्तरावर या प्रकल्पाची झलक सादर करण्यात आली.
कथा — राम वि. रावण: एक शाश्वत संग्राम
या विश्वाची समतोलता ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालक) आणि शंकर (संहारक) यांच्या त्र्यीमध्ये टिकून असते. मात्र या संतुलनातूनच उगम होतो एक अनोख्या राक्षस बालकाचा — जो पुढे रावण बनतो. एक अमर, अजेय आणि विध्वंसक शक्ती. त्याचे उद्दिष्ट एकच विष्णूचा नाश करणे.
याला थोपवण्यासाठी विष्णू स्वतः मानवाचा — राम या क्षीण रूपात — पृथ्वीवर अवतार घेतो. इथूनच सुरू होते एक अखंड लढाई —
राम वि. रावण
माणूस वि. अमरता
प्रकाश वि. अंध:कार
हीच आहे रामायण — एका विश्वयुद्धाची, नशिबाच्या वळणांची आणि सत्त्वाच्या विजयाची अमर कथा — जी आजही अब्जोंच्या श्रद्धा व मूल्यांना आकार देते.
तगडी कलाकार मंडळी व जागतिक दर्जाचा तांत्रिक बाजू
कलाकार:
रणबीर कपूर— राम यांच्या भूमिकेत
यश — रावण या सशक्त भूमिकेत (सह-निर्मातेही)
साई पल्लवी— सीता
सनी देओल— हनुमान
रवी दुबे — लक्ष्मण या वेगळ्या अविष्कारी भूमिकेत
तांत्रिक टीम
हँस झिमर व ए. आर. रहमान — प्रथमच एकत्र संगीत दिग्दर्शन
टेरी नोटरी (Avengers, Planet of the Apes)
गाय नॉरिस (Mad Max: Fury Road) — अॅक्शन कोरिओग्राफी
रवि बन्सल (Dune 2, Aladdin)
रॅम्सी एव्हरी (Captain America) — प्रॉडक्शन डिझाईन
भारताकडून जगाला एक सांस्कृतिक देणगी
नमित मल्होत्रा निर्माते आणि DNEG चे सीईओ, सांगतात, “रामायण हा केवळ एक चित्रपट नाही, तर हे एक सांस्कृतिक चळवळ आहे. आपण आपली परंपरा जागतिक पातळीवर नव्या सादरीकरणात आणतो आहोत. आतापर्यंत रामायण विविध प्रकारे पाहिलं गेलं आहे, पण आता आपण त्याला एका अशा भव्य आणि प्रगत रूपात आणतोय, जे जागतिक चित्रपटमंचावर भारताची ओळख ठरू शकेल.”
नितेश तिवारी , दिग्दर्शक, म्हणतात, “ ही कथा आपल्यात खोल रुजलेली आहे. ती केवळ पौराणिक नसून एक शाश्वत सत्य आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा आत्मा सांभाळून, जागतिक स्तरावर तिचं नव्या भव्यतेत सादरीकरण करणं हे माझं कर्तव्य आणि सन्मान आहे.”
प्रस्ताविक संस्था परिचय
Prime Focus Studios— नमित मल्होत्रा यांनी स्थापन केलेले हे स्टुडिओ जागतिक स्तरावर सिनेमा, टीव्ही, गेमिंगसाठी नावीन्यपूर्ण व दर्जेदार कंटेंट निर्मिती करतात. DNEG च्या आंतरराष्ट्रीय यशाची आणि तांत्रिक कौशल्याची ताकद या स्टुडिओला लाभली आहे.
Monster Mind Creations— प्रसिद्ध अभिनेता यश यांची निर्मिती संस्था, जी सर्जनशील प्रतिभेला चालना देणाऱ्या आणि नव्या दृष्टिकोनातून कथा सादर करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करत आहे. “Toxic” आणि “Ramayana” हे त्यांचे दोन प्रमुख प्रकल्प आहेत.
रामायण — एक भारतीय आत्म्याची जागतिक प्रस्तुती, IMAX आणि आधुनिक सिनेमा माध्यमांची पराकाष्ठा — लवकरच तुमच्या समोर येतेय! KK/ML/MS