खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी कर सवलत

 खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी कर सवलत

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज खासगी क्षेत्रातील नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे निवृत्त होणाऱ्या वा नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणाऱ्या रोखीवर कर सवलत मिळेल. रजा अर्जित करुन जी रोख कमाई होईल. त्यावर ही मर्यादा वाढविल्याने कोणताच कर द्यावा लागणार नाही.

सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना तीन प्रकारच्या सुट्या मिळतात. सिक लिव्ह, कॅज्युअल लिव्ह आणि अर्निंग लिव असे तीन प्रकार आहेत. सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना Leave Encashmentची संधी देण्यात येते. त्यांच्या उरलेल्या सुट्यांचे पैसे त्यांना देण्यात येतात. कंपन्या आणि सरकारकडून हा पैसा देण्यात येतो.

एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर रजा रोख रक्कम जमा केली तर रजेच्या रोख रक्कमेवर सूट (Leave Encashment Limit) मिळते. पण या सूटीवर केंद्र सरकार एका मर्यादेनंतर कर आकारत होते. आता ही मर्यादा आठ पट्टीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना कर लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही मर्यादा वाढवली आहे.

अर्थमंत्रालयाने लिव्ह इनकॅशमेंटवरील कर सवलतीचा मर्यादा आता 25 लाख रुपये केली आहे. आतापर्यंत ही मर्यादा 3 लाख रुपये होती. या निर्णयामुळे निवृत्त होणाऱ्या वा नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणाऱ्या रोखीवर कर सवलत मिळेल. EL रजेवर कर आकारण्यात येतो आणि कर कपात करुन ऊर्वरीत रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येते.

SL/KA/SL

26 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *