छ.संभाजीनगरमधुन गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
छ. संभाजी नगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मातृदिनानिमित्त सोशल मिडियावर शुभेच्छा आणि संदेश ओसंडून वाहत आहेत. फुटले आहे. मातृप्रेमाच्या या उत्सवी वातावरणात महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर मधुन समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली असून, गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
छ.संभाजीनगरमध्ये राहत्या घरी लिंग निदान करणाऱ्या महिलेलेवर कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीय. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले.
आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणारी एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची कॅश देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य,लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत एक इंजिनिअरिंग करणारी तरुणी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
SL/ML/SL
12 May 2024