सोन्याच्या दरात मोठी वाढ
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोन्याच्या दरात आता अचानक वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दराने आता विक्रमी उच्चांक गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकेकाळी सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता. आता सोने प्रति 10 ग्रॅम 65 हजार रुपयांवर गेले आहे.
आज, गुरूवार 7 मार्च रोजी 5 एप्रिल 2024 रोजी एमसीएक्स एक्सचेंजवर डिलिव्हरीसाठीचे सोने 65,434 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढीसह व्यवहार करत आहे. आज सकाळी सोने 65,205 रुपयांवर उघडले. तर 5 जून 2024 रोजी डिलिव्हरीसाठी असलेले सोने आज 65,852 रुपयांवर व्यवहार करत आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर आज म्हणजेच गुरूवार 7 मार्च रोजी 5 मे 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 74,085 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. तर 5 जुलै 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 75,362 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज जागतिक सोन्याच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.25 टक्के किंवा 5.40 डाॅलरच्या वाढीसह 2,163.60 डाॅलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या प्रति औंस 2,155.96 डाॅलरवर व्यवहार करताना दिसत आहे.
आज चांदीच्या जागतिक किमतीत घसरण दिसून आली. कॉमेक्सवर चांदीची फ्युचर्स किंमत 0.58 टक्क्यांनी किंवा 0.14 डाॅलरने कमी होऊन 24.35 डाॅलर प्रति औंसवर आहे. त्याच वेळी,चांदीची जागतिक स्पॉट किंमत घसरत आहे आणि 24.16 डाॅलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
SL/KA/SL
7 March 2024