मेधा पाटकरांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, 8 : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याविरुद्ध मानहानीच्या एका प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांची एका वर्षाच्या तात्पुरत्या कालावधीवर सुटका करण्याचे आदेश दिले.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने एक वर्षाचा प्रोबेशन कालावधी दिला आहे. पाटकर यांना अट ठेवण्यात आली की ते चांगले आचरण करतील.या अटीवर त्यांना एका वर्षाच्या तात्पुरत्या कालावधीसाठी सोडण्याचे आदेश दिले. त्यांचे वय लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला आहे.
2000 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच महिन्यांच्या शिक्षेविरुद्ध पाटकर यांनी केलेले अपील ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग म्हणाले की त्यांनी पाटकरचे वय आणि गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्यांना यापूर्वी कधीही दोषी ठरवले नव्हते हे लक्षात घेतले आहे. न्यायमूर्तींनी 70 वर्षीय पाटकर यांना ठोठावलेला दंडही 10 लाखांवरून 1 लाख रुपयांवर आणला.
मानहानीचा खटला काय आहे ते जाणून घ्या
व्ही.के. सक्सेना यांनी 2001 मध्ये पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी ते अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. सक्सेना यांनी 25 नोव्हेंबर 2000 रोजी देशभक्ताचा खरा चेहरा अशी प्रेस नोट जारी करून पाटकर यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.