इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठी भरती
job career
मुंबई, दि.१३ : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या १२७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार Indian Overseas Bank ची अधिकृत वेबसाइट iob.in किंवा ibpsonline.ibps.in वर फॉर्म भरू शकतात. इच्छुक उमेदवार ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधर आणि पदव्युत्तर दोन्हीही या अर्ज करू शकतात. इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे वय २४ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट देण्यात आली आहे.
Indian Overseas Bank च्या या भरतीसाठी उमेदवारांकडे BE, B.Tech, B.Arch, MSc, ME, M.Tech, MBA, MCA, PGDCA किंवा PGDBA सारखी पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा तांत्रिक क्षेत्रात पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. एखाद्याकडे बँकिंग किंवा वित्त संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी असेल तर त्याला अतिरिक्त फायदे मिळतील.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात केली जाईल. सर्वप्रथम १०० गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा असेल. यामध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील आणि उमेदवाराला ते सोडवण्यासाठी २ तासांचा वेळ मिळेल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. शेवटच्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.