Bank of Baroda मध्ये नोकरीची मोठी संधी

बँक ऑफ बडोदाने ‘लोकल बँक ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 24 जुलै 2025 पर्यंत बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 2500 ‘एलबीओ’ रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनियरिंग किंवा मेडिकलमध्ये व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत जाहिरात पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्या.
अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
शुल्क
सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदारांसाठी ₹850 शुल्क आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी ₹175 शुल्क लागू आहे.