शेअर बाजारात मोठी पडझड ! ब्लॅक मंडे ! सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला; घसरणीची 5 प्रमुख कारणे

जितेश सावंत
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स तसेच निफ्टीत 1.50% पेक्षा जास्त घसरण झाली. (Black Monday on D-Street) निफ्टीची पातळी 23,100 च्या खाली जाताना दिसली. सर्व क्षेत्रांमध्ये घसरण होताना दिसली. मिड आणि स्मॉलकॅप 3.5% ने घसरले. निफ्टी मिडकॅप मध्ये जून 2024 पासून एक दिवसाची सर्वात मोठी घसरण आज झाली. स्मॉलकॅप इंडेक्स 4% घसरला, पाच महिन्यांतील सर्वात मोठी घसरण.
Sensex and Nifty Fall Over 1.50%, mid, and small-cap down 3.5% each, Nifty Midcap posts biggest single-day fall since June 2024. Small cap index falls 4%, biggest fall in five months
यामागील प्रमुख कारणे म्हणजे अमेरिकेतील मजबूत नोकरीच्या आकडेवारीमुळे फेड दर कपातीची आशा कमी होणे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, रुपयाची घसरण (सर्व जागतिक चलनांमध्ये रुपयाची सर्वात मोठी घसरण विरुद्ध डॉलर, ८६.५०/$ पार .Rupee Sees Biggest Fall Vs Dollar Amongst All Global Currencies, Crosses 86.50/$) आणि परदेशी गुंतवणूकदारांनी विकलेल्या शेअर्सची मोठी प्रमाणातील विक्री.
- अमेरिकेची आर्थिक आकडेवारी आणि फेडचे दरवाढ धोरण अमेरिकेतून शुक्रवारी जाहीर झालेल्या मजबूत नोकरीच्या आकडेवारीने जागतिक बाजाराला धक्का दिला. डिसेंबरमधील बेरोजगारी दर 4.1% पर्यंत घसरला आहे, तर नोकरीची वाढ ठोस राहिली आहे.
मजबूत रोजगार बाजारपेठेमुळे फेडरल रिझर्वकडून लवकर दरकपातीची शक्यता कमी झाली आहे. यामुळे जागतिक तरलतेत घट झाली असून (tightened global liquidity) उदयोन्मुख बाजारांवर (emerging markets) दडपण वाढले आहे.
- परदेशी गुंतवणूकदारांची विक्री (FPI Selling)
जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ₹21,350 कोटी किमतीचे शेअर्स विकले आहेत.
डिसेंबरमध्येही ₹16,982 कोटींची विक्री झाली होती.
FPIs sold ₹21,350 crore worth of shares in January, following ₹16,982 crore in December.
भारतीय शेअर बाजाराचे वाढलेले मूल्यांकन, अपेक्षेपेक्षा कमी कॉर्पोरेट नफ्याचे आकडे, आणि अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड.
(High valuations in Indian markets, weaker-than-expected corporate earnings, and rising US bond yields.
FPIs sold ₹21,350 crore worth of shares in January, following ₹16,982 crore in December.
3.कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ
रशियावर अमेरिकेने नव्याने घातलेल्या निर्बंधांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती 15 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारत हा तेलाचा मोठा आयातदार असल्याने याचा थेट परिणाम देशाच्या वित्तीय तुटीवर आणि महागाईच्या दबावावर होतो (Crude Oil Prices: Oil prices surged to a 15-week high due to US sanctions on Russia, raising concerns about inflation and fiscal pressures in India.)
- रुपयाची ऐतिहासिक घसरण
भारतीय रुपयाने सोमवारच्या व्यवहारात 86.50 प्रति डॉलरचा नीचांक गाठला.
मजबूत डॉलर, वाढलेली अमेरिकन बॉण्ड यील्ड आणि मजबूत रोजगार आकडेवारी यामुळे रुपयावर दबाव आला.
यामुळे आयातीचा खर्च वाढेल आणि गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होईल.( Weak Rupee: The rupee hit a record low of ₹86.50 per dollar, increasing import costs and fueling capital outflows. )
- जागतिक बाजारातील विक्रीचा परिणाम
अमेरिकेतील घसरणीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. MSCI आशियाई निर्देशांक सलग चौथ्या दिवशी घसरला.
अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारी आणि फेड रेट कपातीच्या कमी अपेक्षांमुळे जागतिक बाजारात विक्रीचा माहोल आहे.
भारतीय बाजार पुढील काही दिवस अस्थिर राहण्याची शक्यता आहे. जागतिक प्रतिकूल परिस्थिती आणि देशांतर्गत आर्थिक ताण यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant