सोन्याच्या दरात मोठी घसरण

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील कित्येक महिन्यांपासून सोने दरात सतत वाढ होती होती. आता दर काहीसा कमी झाला आहे. सोन्याचा दर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरुन ३००० रुपयांनी कमी झाला आहे..
एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव सोमवारी ५५,७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर सोन्याचा सर्वोच्च पातळीवरील दर ५८,८४७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. या सर्वोच्च दरावरुन आता सोनं ३००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा भाव ६३,३३० रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.
आयआयएफएल सिक्युरिटीचे रिसर्चर अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं आणि चांदीचा भाव यावेळी रेंज बाउंड आहे. सोन्या-चांदीच्या किमतीतील प्रमुख ट्रिगर यूएस डॉलरच्या दरामुळे येत आहे. रेंज बाउंड ट्रेडमध्ये डॉलर इंडेक्स १०४ च्या वर आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असून सध्या दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
SL/KA/SL
7 March 2023