Tata Motors च्या या गाड्यांवर मोठी सवलत

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार खरेदीचा हंगाम ओसरत असताना काही कंपन्या ग्राहकांना सवलत देऊन खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत. टाटा मोटर्स ही भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीद्वारे निर्मित अनेक कार्संना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तमोत्तम उत्पादनाच्या बळावर टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना खुश करण्यासाठी ही कंपनी नेहमी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते.टाटा मोटर्सने काही गाड्यांवर विशेष सवलत जाहीर केली आहे. Tata Punch आणि Tata Nexon SUV या टाटांच्या ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या कार्सवर मात्र कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. सवलत असलेल्या गाड्या पुढे दिल्या आहेत.
टाटा टियागो (Tata Tiago)
पेट्रोलवर चालणाऱ्या टियागोवर एकूण ३०,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे. यामध्ये एक्सचेंज डिस्काउंट – १०,००० रुपये आणि ग्राहक योजना -२०,००० यांचा समावेश होतो. तर CNG-Tiago वर ३०,००० रुपयांपर्यंतची ग्राहक योजना सवलत; १०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ३,००० रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट अशी एकूण ४३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
टाटा टिगोर (Tata Tigor)
या कारच्या पेट्रोल मॉडेलवर ३३,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे. तसेच CNG वर चालणाऱ्या मॉडेलवर तब्बल ४८,००० रुपयांपर्यंत सूट आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या डिस्काउंट ऑफर्समध्ये एक्सचेंज ऑफर्स, ग्राहक सवलत योजना आणि कॉर्पोरेट डिस्काउंट्स यांचा समावेश होतो.
टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)
टाटा मोटर्सच्या लोकप्रिय अल्ट्रोझ हॅचबॅकच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सवर सवलत दिली जात आहे. पण काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Tata Altroz CNG वर कोणतीही ऑफर देणे कंपनीने टाळले आहे. या मॉडेलच्या XE आणि XE+ व्यतिरिक्त इतर पेट्रोल व्हेरियंटवर २५,००० रुपयांपर्यंत एकूण सूट दिली जात आहे. तसेच XE आणि XE+ ट्रिम्सवर एकूण १० हजार रुपयांची सवलत मिळते. डिझेलच्या सर्व मॉडेल्सवर ३०,००० रुपयांचा डिस्काउंट मिळतो.
टाटा हॅरियर आणि सफारी SUV (Tata Harrier and Safari)
कार्सवर ३५ हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. यामध्ये २५,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश होतो.
SL/KA/SL
10 June 2023