महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल
मुंबई, दि. ८ : नुकत्याच पार पडलेल्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अभूतपूर्व यशानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाच्या जागतिक वाढीसाठी आणि महिला क्रिकेटला अधिक बळकटी देण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
ICC बोर्डाने स्पर्धेच्या पुढील आवृत्तीत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या 8 वरून वाढवून 10 करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बहु-क्रीडा स्तरावर क्रिकेटचा प्रभाव वाढवण्यासाठी ICC सक्रियपणे प्रयत्न करत आहे. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक (LA28) खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रगतीचा ICC बोर्डाने सकारात्मक आढावा घेतला.
LA28 मध्ये पुरुष आणि महिलांच्या T20 स्पर्धांमध्ये प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील, ज्यामध्ये एकूण 28 सामने खेळवले जातील.
क्रिकेटचा समावेश 2028 पर्यंत खालील प्रादेशिक स्पर्धांमध्ये निश्चित झाला आहे:
आशियाई खेळ 2026 (ऐची-नागोया, जपान)
आफ्रिकन खेळ 2027 (कैरो, इजिप्त)
पॅन-अम गेम्स 2027 (लिमा, पेरू) – येथे क्रिकेट प्रथमच खेळला जाईल.
जागतिक स्तरावर उच्च-श्रेणीचा डिजिटल फॅन अनुभव देण्यासाठी ICC ने व्हिडिओ गेमिंग हक्कांसाठी टेंडर (ITT) जारी करण्यास मान्यता दिली आहे.
डेटा आणि AI: नवीन व्यावसायिक संधी शोधण्यासाठी डेटा कन्सोलिडेशनप्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून फॅन एंगेजमेंट आणि डेटा ॲनालिटिक्सवर लक्ष केंद्रित करेल.