हेमंत सोरेन, तेजस्वी यादव यांच्याविरोधात ED ची मोठी कारवाई

रांची, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मुख्यमंत्र्यांवर आरोप ठेवले असून दिल्लीतून काल रात्री उशीरा त्यांची गाडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.त्यानंतर जवळपास तीस तासांपासून ईडीचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर हेमंत सोरेन हे सरकारी वाहनातून आपल्या रांची येथील निवासस्थानी आले असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर आपल्या गाडीतून त्यांनी माध्यमांना हात उंचावून दाखविला.
उद्या, ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्याआधी आज त्यांनी आपल्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ईडीच्या चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या बैठकीला उपस्थित होत्या. जर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली तर कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदी येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. कालच बिहारला नवं सरकार मिळालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री जरी नीतीश कुमारच असले, तरी जेडीयू आणि आघाडीचं सरकार जात एनडीए महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर आता इडीकडून राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची लँड फॉर जॉब्स प्रकरणात यांची चौकशी करण्यात येत आहे, 12 अधिकाऱ्यांचे पथक त्याची चौकशी करत आहे. तेजस्वी सकाळी 11.30 वाजता पाटणा येथील बँक रोड येथील ईडी कार्यालयात पोहोचली होती.
या कारवाई नंतर तेजस्वी समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाचे आमदार, खासदार जवळच्या मंदिरात बसले. भाऊ तेज प्रताप आणि बहीण मीसा भारतीही ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. याआधी सोमवारी ईडीने आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांची 10 तास चौकशी केली.तेजस्वींना ईडीने 5 जानेवारीला दिल्लीत चौकशीसाठी बोलावले होते, पण ते गेले नाही. तेव्हा ते बिहारचे उपमुख्यमंत्री होते. तेजस्वींच्या चौकशीसंदर्भात ईडी कार्यालयाजवळ सुरक्षा वाढवण्यात आली होती.
SL/KA/SL
30 Jan. 2024