पर्यावरण रक्षण संदेशासाठी तीन हजार किमी चा सायकल प्रवास
नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक येथील 60 वर्षाच्या वरील वयोगटातील तरुण तडफदार सायकलवीर राजेश्वर सूर्यवंशी,श्रीराम पवार, कर्नल शिवनारायण मिश्र, डॉ. साहेबराव कासव, आणि उल्हास कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) ते पशुपतिनाथ (नेपाळ) हा तब्बल 3000 किलोमीटरचा सायकल प्रवास करून “स्वच्छ पर्यावरण आपली जबाबदारी” हा संदेश दिला.
हे सायकल अभियान यशस्वीरित्या पूर्ण करून ते काल नाशिक येथे परतले, या सायकल वीरांचे मोठ्या दिमाखात ढोल ताशांच्या गजरात ,औक्षण करून हार घालून नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले.
भारत माता …. की जय ,
हर हर महादेव , नाशिक सायकलिस्ट ….. की जय …
या जयघोषात संपूर्ण रेल्वे स्टेशन दणाणले. हा खडतर सायकल प्रवास करून एक सामाजिक संदेश दिल्याबद्दल या सायकल वीरांचे सायकल प्रेमी आणि नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
ML/KA/SL
4 Dec. 2022