प्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती, बीबी का मकबरा
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीबी का मकबरा ही प्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती आहे आणि औरंगाबादमधील सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाली. औरंगजेबचा मुलगा शहजादा आझम शाह याने त्याच्या प्रिय आईच्या बेगम राबिया दुरानीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली होती .यासाठी वापरण्यात आलेले संगमरवर जयपूरच्या खाणीतून आणल्याचे सांगितले जाते.
वास्तू अत उल्ला यांनी बांधल्याचे म्हटले जाते. मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते. त्यासाठी दीडशेपेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला. हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध आहे. मकबऱ्याच्या परिसरात असलेली भव्य बाग विशेष आकर्षण आहे.
विमानाने : बीबी का मकबऱ्यापासून विमानतळ जवळपास 10 किमी अंतरावर आहे.
रेल्वेने : रेल्वे स्टेशनपासून बीबी का मकबरा सुमारे 36 किलोमीटर दूर आहे.
वाहनाने : बिबी का मकबरा औरंगाबादपासून 4 किमी आहे, राज्य परिवहन बस किंवा खासगी टॅक्सीद्वारे भेट देता येते.
ML/KA/PGB 27 Dec 2023