भाईंदर पश्चिमेला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन !

मीरा-भाईंदर दि २९:– मिरा-भाईंदर शहरात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ करण्याच्या दिशेने आज आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आज देव आंगन, देवचंद नगर, जैन मंदिर (बावन जिनालय) समोर, भाईंदर पश्चिम येथे नव्या शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नव्या शाखा कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाची जनतेशी अधिक जवळीक निर्माण करून स्थानिक प्रश्न सोडविण्यास व विकासकामांना चालना देण्यास मोठी मदत होणार आहे. संपूर्ण परिसरात शिवसेनेचे घोषवाक्ये, भगव्या झेंड्यांचा उत्साह व शिवसैनिकांचा जोश यामुळे उद्घाटन सोहळा ऐतिहासिक ठरला.
उद्घाटनावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले :
“हे कार्यालय फक्त शाखा नसून हे जनतेचे घर असेल. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व शिवसेना विचार जन-जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका पार पाडेल. १४६ विधानसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे जनतेच्या समस्या सोडविल्या जातात, त्यांचे कार्य केले जाते त्याचप्रकारे या नवीन शाखा कार्यालयाच्या माध्यमातून १४५ विधानसभा मतदारसंघामधील जनतेच्या प्रश्नांचे निदान येथे केले जाईल. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि हे शाखा कार्यालय त्याचे जिवंत उदाहरण ठरेल.”ML/ML/MS