जनतेला वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करा!

 जनतेला वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करा!

भाईंदर दि १ : — परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय मागण्या चर्चेतून मार्गी लावणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती आम्हाला मान्य आहे. मात्र, मिरा – भाईंदरमधील सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकत, बेकायदेशीररित्या संप पुकारून राजकीय स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे कदापिही सहन केले जाणार नाही.

या पार्श्वभूमीवर, अशा अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिल्या आहेत. सरकार जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अडवून अराजक माजवणाऱ्यांना योग्य ते कायदेशीर प्रत्युत्तर दिले जाईल. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *