पुढील वर्षी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल
मुंबई दि २७ : शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत ,याखेरीज अन्य अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या किमान २५ टक्के वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
मराठी शाळांच्या पटसंख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा आदींबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, मूळ प्रश्न विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला त्यावर संजय केळकर, प्रवीण दटके, अस्लम शेख, अमित देशमुख , कैलास पाटील, राहुल कुल यांनी उपप्रश्न विचारले.
विद्यार्थी आधार कार्ड प्रमाणीकरणामुळे बोगस विद्यार्थी शोधून काढले जात आहेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्याचं हेल्थ कार्ड तयार केलं जात आहे, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहिती देखील मंत्री भुसे यांनी यावेळी दिली. मराठी भाषा न शिकवणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असंदेखील मंत्री भुसे यांनी सांगितले.ML/ML/MS