मंत्री भुमरे आणि अंबादास दानवेंमध्ये बैठकीतच थेट झाला राडा

 मंत्री भुमरे आणि अंबादास दानवेंमध्ये बैठकीतच थेट झाला राडा

छ. संभाजीनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. There was a direct argument between Minister Bhumre and Ambadas Danve in the meeting itself

त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले त्यांनी मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे पाहायला आले.
यावेळी काही काळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता.

ML/KA/PGB
7 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *