भुलाबाई उत्सवाची उत्साहात सांगता
वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विदर्भातील पारंपरिक उत्सवांमध्ये विशेष स्थान असलेल्या भुलाबाई उत्सवाची काल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात सांगता करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी लहान मुलींनी पारंपरिक रीतीने भुलाबाईची स्थापना केली होती, दसऱ्यापासून ते कोजागिरी पोर्णिमेच्या रात्रीपर्यंत मुलींनी भुलाबाईची पारंपारिक गाणी म्हणत हा उत्सव साजरा केला. वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भुलाबाई उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
भुलाबाई उत्सवात मुलींनी पारंपरिक गाणी गात घरोघरी भेटी दिल्या. ‘कारल्याची बी लावं ग सूनबाई’ आणि ‘उलीसा पापड भाजीला’, आपे दुध तपे, दन दन कुदळी माय मन मन माती’ यांसारखी गाणी लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या गाण्यांसोबतच नवीन धान्यापासून बनवलेल्या पदार्थांची खिरापतही वाटली गेली. आज भुलाबाई उत्सवाचा शेवट विसर्जनाने करण्यात येत आहे.
ML/ML/PGB 17 oct 2024