Bhul Bhulaiyaa 3′ चे जोरदार advance booking

 Bhul Bhulaiyaa 3′ चे  जोरदार advance booking

मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित अभिनीत ‘भूल भुलैया 3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांना या चित्रपटाकडे आकर्षित केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे चार दिवस उरले असताना, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. रिलीजच्या आधीच चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून अॅडव्हान्स बुकींगच्या पहिल्या दिवशी 17,000 तिकिटे विकली गेली आहेत.

पहिल्याच दिवशी 17,000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत ज्यांची किंमत 48 लाखांपर्यंत आहे. सध्या 12 लाख रुपयांच्या तिकीट विक्रीसह गुजरात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने 11 लाखांची तिकीट विक्री केलीये. तिकीटाची विक्री अशीच सुरू राहिल्यास सोमवारी रात्रीपर्यंतच अॅडव्हान्स बुकींगचा आकडा 1 कोटींच्य घरात जाऊ शकतो. हे चित्र प्रचंड आशादायक असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्येतर ऑनलाईन बुकींगलाही सुरूवात झाली आहे.

भूल भुलैया 2’ मध्ये गाजलेल्या ‘रूह बाबा’च्या भूमिका कार्तिक आर्यन याही चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ति डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनीस बझमी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

SL/ ML/ SL

28 oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *