मुसळधार पावसाने भुईमूगाच नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावला….

वाशीम दि १७:– वाशीम जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हळद आणि भुईमूग काढणीचा हंगाम सुरू असताना, अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मेहनत वाया घातली आहे. वाशीम तालुक्यातील सुदी शेतशिवारात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. मोठ्या प्रमाणावर भुईमूग शेतात काढून सुकवण्यासाठी पसरवलेली असताना, शेतकऱ्यांना आपल्या पिकांना झाकण्याची वेळसुद्धा मिळाली नाही.हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे भुईमूग सडण्याची भीती व्यक्त केली जात असून, शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ML.MS