अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून शेतकऱ्याची केली फसवणूक

 अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून शेतकऱ्याची केली फसवणूक

पुणे, दि १५: तक्रारदार यांचे त्यांच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत शेजारी जागा असणाऱ्यांनी संगनमत करून त्यामध्ये परस्पर खोटा बदल केला. घर शेजाऱ्याच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवुन ते कागदपत्रे कोर्टातही सादर केले. घर त्या जागेवरच नसूनही त्या कागदपत्रांवरून कोर्टाने घर पाडण्याचेही आदेशही दिले. याप्रकारे तक्रादार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित भूमिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार मुळशी तालुक्यातील राउतवाडी येथे राहणारे अरुण राऊत यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचाही इशारा देखील त्यांनी दिला आहे.

याबाबत तक्रारदार तथा शेतकरी अरुण राऊत यांनी पौड तहसीलदार, पौड पोलीस ठाणे येथे आमरण उपोषण करण्याचा अर्ज केला आहे. अर्जानुसार राऊत यांचे राउतवाडी, लवळे, ता. मुळशी येथे गट नंबर 413 येथे दहा गुंठे जागा आहे. त्याला लागूनच गट नंबर 430 असून त्याचे मालक शीतल नुपूर लडकत यांच्या सोबत गेली ३७ वर्षा पासून जमिनीवरून वाद सुरु आहे. याबाबत २००६ साली शासकीय मोजणी झाली, ती मोजणी भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी हेमंत निगडे यांनी केली.

त्या मोजणीची क प्रत गटाच्या नकाशा प्रमाणे केली. पण राऊत यांचे घर सीमेवर नसताना सु‌द्धा (गट नंबर 413 व गट नंबर 430) सीमेवरवर घर असल्याचे ड्रॉइंग काढून दाखवले. त्यानंतर राऊत यांनी खात्री करायला २०२१ ला खाजगी मोजणी केली. त्यात त्यांचे घर गट न. ४१३ मध्ये दाखवले व घरा मागे म्हणजे लाईन आणि घरापासून चे अंतर २५ फूट जागा सु‌द्धा दाखवली. त्यानंतरही २०२३ मध्ये दोन्ही गटाच्या सरकारी मोजण्या झाल्या ती मोजणी प्रसाद तरटे आणि अंकुश जाधव यांनी केल्या असता ती पण नकाशाला ग्राह्य न धरता त्यांचे पूर्ण घर गट न. ४३० मध्ये दाखवले.

वास्तविक पाहता राऊत यांचे घर गट क्रमांक 430 पासून दूर असल्याने त्यांनी हे प्रकरण मी सर्व वरिष्ठ अधिका-यान कडे पोहचवले व पौड च्या अधिका-यांना जागेवर आणून दाखवले परंतु ते फक्त मान हलवतात बाकी कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. जागेबाबत पुरावा म्हणून तसे नकाशे देखील उपलब्ध आहेत. या प्रकरणा सबंधी त्यांनी शासकीय अधिकारी व प्रदिवादी यांच्या विरोधात हे प्रकरण लावून धरले आहे. अमरण उपोषण करणार असल्याने मला व माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे, तरी याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाचा मला न्याय मिळवून ‌द्यावा आणि मोजणी अधिकारी, प्रतिवादी व अजून वरून कोणाचा हात असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून मला योग्य न्याय मिळवून ‌द्यावा, अन्यथा मी अमरण उपोषणास बसन्याचा निर्णय घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे

मोजणी ऑफीस मधिल अधिकारी व त्या वेळी मोजणी करणारे कर्मचारी आणि आमचे प्रतिवादी यांनी संगनमताने विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने मोजणी नकाशामध्ये घर नसताना सुद्‌धा नकाशामध्ये दाखवण्यात आले आहे. भूमिअभिलेख मोजणी अधिकाऱ्यांकडून कडून मोजणी संदर्भात सुनावणी बाबत योग्य तो निर्णय देण्यात टाळाटाळ करण्यात येत असून चुकीचे काम केल्यास संबंधित 3 मोजणी अधिकारी आणि प्रतिवादी याच्यावर यांची चौकशी करून कार्यवाही न झाल्यास मी सहकुटुंब आज रोजी १५ सप्टेंबर २०२५ रोजी अमरण उपोषणास बसणार आहे, हे सगळ करून पण मला न्याय नाही मिळाला तर मी विष पिऊन आत्मदहन करणार आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *