BHMS डॉक्टरांना alopathy व्यवसायाची परवानगी नाही

 BHMS डॉक्टरांना alopathy व्यवसायाची परवानगी नाही

मुंबई दि १६ : राज्यातील ग्रामीण भागात आवश्यक असणारे MBBS डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे BHMS डॉक्टरांना रुग्णांवर केवळ alopathy औषधोपचार करण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना alopathy चा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिली.

अशी परवानगी देणे रुग्णांच्या आरोग्याशी खेळणं आहे त्यामुळे त्यांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची नोंदणी देऊ नये अशी मागणी डॉ तुषार राठोड यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर केली होती. त्याला अतुल भोसले यांनी पाठिंबा दिला तर डॉ संजय कुटे यांनी विरोध केला. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसारच BHMS डॉक्टरांना alopathy औषधोपचार करण्यासाठी नोंदणी प्रक्रियांचे portal सुरू करण्यात आलं आहे, अंतिम आदेश आल्यावर त्याची पूर्तता करण्यात येईल अशी माहिती देखील राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *