मुलींनी दिला भुलाबाईला निरोप, भुलाबाईची गाणी लुप्त होण्याच्या मार्गावर….

यवतमाळ दि. ७ ( आनंद कसंबे ) : भुलाबाई स्थापना आणि यावेळी गायली जाणारी गोड गाणी गाणी खरंतर ही एक अत्यंत चांगली परंपरा आहे .कारण या भुलाबाईच्या गाण्यांमध्ये मुलींच्या स्त्रियांच्या अख्ख्या आयुष्यचा सार समावलेला आहे. पूर्वी घराघरात भुलाबाईची स्थापना व्हायची आणि त्यावेळी मोहल्यातील संपूर्ण मुली एकत्र येऊन गोड गाणी गायच्या.

परंतु काळाच्या ओघात भुलाबाईची स्थापना झपाट्याने कमी होत आहे . शहरांमध्ये अक्षरशः भुलाबाई दिसेनाशा झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात भुलाबाईची परंपरा थोड्याफार प्रमाणात थोड्याफार प्रमाणात का होईना पण टिकून आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात याच भुलाबाईंना निरोप देण्यात आला. यावेळी अत्यंत गोड चालीत मुलींनी गाणी सादर केली आणि खिरापत वाटून भुलाबाईला निरोप दिला.ML/ML/MS