भिवंडीतील धामणकर नाका गणेशोत्सव मंडळास प्रथम पारितोषिक…

भिवंडी:दि.03 ऑगस्ट गणेशोत्सव साजरा करताना त्याचे पावित्र्य राखण्याची सर्वाची जबाबदारी आहे.जेथे शांतता नांदत असते तेथे प्रगती व विकास होत असतो,त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेच्या भावनेतून सण साजरा करणे आवश्यक आहे.उत्सव साजरा करताना शासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व कायद्याचे पालन करावे असे असे प्रतिपादन ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी केले.ते भिवंडीत पोलिस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ च्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.याप्रसंगी
पोलीस उपायुक्त शशिकांत बारोटे,सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे,गणेश महामंडळ अध्यक्ष मदन भोई व सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस परिमंडळ – 2 भिवंडी यांच्यावतीने गणेशोत्सव 2024 मध्ये राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा शांतता राखून व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न केलेल्या गणेशोत्सव मंडळाना पारितोषिक वितरण समारंभ भिवंडी शहरातील अंजुरफाटा येथील ओसवाल हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या स्पर्धेत प्रथम क्रमांक धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला असून मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी,दिलीप पोद्दार,हसमुख पटेल,राजेश शेट्टी, मोहन बल्लेवार, तारू जाधव, संजय शाह, ईश्वर पामु, रमेश पुजारी, प्रशांत पुजारी, महेश कापरे, संतोष जंपाल, राम बुरा, यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यासह बाळ गोपाळ मित्र मंडळ,(साई प्रसन्न सोसायटी) व स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ (द्वितीय ) रामेश्वर मित्र मंडळ
व गणेश मित्र मंडळ (तृतीय पारितोषिक)
स्व.पंडित नाना मित्र मंडळ(विशेष उल्लेखनीय पारितोषिक) तर शिवशक्ती मित्र मंडळ, संयुक्त मित्र मंडळ,भावना ऋषी बाळ गोपाळ मित्र मंडळ,जय भारत मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळांना विशेष पारितोषिक देऊन.सन्मानित करण्यात आले.पाच दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेले मुरलीधर मंदिर गणेशोत्सव मंडळ, संत नामदेव गणेश उत्सव मंडळ, गणपती मंदिर उत्सव मंडळ आदी मंडळाना सुद्धा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपला मात्र आजही रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे.सर्वत्र अस्वच्छता आहे,विसर्जन स्थळ दुरूस्त करावेत अशा विविध मागण्या गणेश महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे केले.आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी केले.तर कार्यक्रम सुत्रसंचालन शैलेश मांजरेकर यांनी केले . ML/ML/MS