भिडेवाडा मध्यरात्री सरकारजमा, इमारत जमीनदोस्त

 भिडेवाडा मध्यरात्री सरकारजमा, इमारत जमीनदोस्त

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी म्हणजे काल रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त झाल

भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे, यासाठी महापालिकेत ठराव झाला होता. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १३ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हाच निर्णय कायम ठेवला. एका महिन्याच्या आत जागा महापालिकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जागामालक आणि भाडेकरूंना दिला होता. ही मुदत तीन डिसेंबरला संपल्याने महापालिकेने सोमवारी पोलीस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली.

आज सकाळी महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत भिडेवाड्याची जागा मध्यरात्री उशिरा ताब्यात घेतली. जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी याचिका भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिकाही सोमवारी फेटाळून लावली. ही जागा ताब्यात घेण्यास आणखी विलंब होऊ नये, यासाठी महापालिकेने पोलिसांशी समन्वय साधून रात्री जागा ताब्यात घेतली.

काल सायंकाळपासूनच वाड्याच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमधून सुमारे ५० बिगारी दाखल झाले. रात्री अकराच्या सुमारास वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली.

असा घेतला ताब्यात

  • शिवाजी रस्त्यावरील वाहतूक थांबवली
  • पदपथावरील दिवे, बोलार्ड काढले
  • वाड्यावर लावलेले पोस्टर, झेंडे, दुकानांच्या पाट्या काढल्या.
  • • जेसीबीने पाट्या काढताना वाड्याचा काही भाग कोसळला. दुकाने उघडून पंचनामा केला

• गॅस कटरने शटर तोडले

• दोन जेसीबीच्या सहाय्याने वाडा पाडण्याचे काम सुरू

• इमारत धोकादायक झाल्याने आपोआप काही भाग कोसळत होता.

• वाड्याचा राडारोडा रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरूकरण्यात आले.

ML/KA/SL

5 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *