पहिल्या दिवशीच ‘भेडिया’ची तगडी कमाई
मुंबई,दि. 26 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमर कौशिक दिग्दर्शित अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेला ‘भेडिया’ चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडाही समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जवळपास 7 कोटी होती. Bhedia’s strong earnings at the box office on the first day itself
चित्रपटातील गाणी आणि संवाद यांनाही चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच 30,000 तिकिटे विकली गेली होती.
26 Nov. 2022