भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणांमधून मुंबई ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात मागील 8-10. दिवसात तानसा, वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत. आज भातसा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागले आहे. काल संध्याकाळी 6:30 च्या सुमारास भातसा धरणाचे तीन दरवाजे 0.50 cm ने उघडण्यात आले आहेत.
काल भातसा धरण
पाण्याची पातळी – 138.00 मी होती .
स्टोरेज क्षमता – 867.508 mm3 (88.87%)
स्पिलवे डिस्चार्ज :-
धरणाची पातळी 138.00 मीटर राखण्यासाठी 3 गेट्स 50 सेमी, काल संध्याकाळी 6.30 वाजता उघडले गेले आहेत. धरणाच्या 3 गेटमधून विसर्ग (1,3,5) मधून पाण्याचा विसर्ग 5145.70 क्युसेक इतका असणार आहे.
धरणक्षेत्रात 1 जूनपासून एकूण पाऊस 1913.21 मिमी इतका पडला आहे. एकंदरीत शहापूर तालुक्यातील तीन धरणे भरल्याने मुंबईकर सुखावले आहेत.
ML/ML/PGB
4 Aug 2024