भास्कर जाधवांची विधानसभेत दिलगिरी…

मुंबई दि १८ — काल विधानसभेत शिवसेना उबाठा पक्षाच्या आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हातवारे करून वक्तव्य केली आणि सभागृहाबाहेर देखील माध्यमांसमोर अध्यक्षांबाबत वक्तव्ये केली ही अश्लील पद्धतीची होती , त्यांनी माफी मागावी अन्यथा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावे अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी केली. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मंत्री आशिष शेलार यांनी पाठिंबा दिला, कोणीही आक्रमक व्हायला हरकत नाही मात्र आक्रस्ताळेपणा योग्य नाही , सभागृहातील सर्वोच्च पदाला उद्देशून चुकीचे आरोप करणे योग्य नाही असं शेलार म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून देखील खाली बसून टोमणे मारणे , वाईट भाषा वापरणे योग्य नाही असं शेलार म्हणाले.
मी नियम युक्त कामकाजाबाबत आग्रही आहे, मात्र मी बोलतानाही खाली बसून टोमणे बाजी होत असते , आपण जे वक्तव्य बाहेर माध्यमांसमोर केलं ते योग्य नव्हते , मला त्याचा खेद वाटला, मात्र आम्ही केलेले हातवारे गुन्हा ठरतो , सत्तारूढ सदस्यांनी केले तर ते आविर्भाव हे योग्य नाही, आपण आपल्या वक्तव्याबाबत माफी मागतो असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
त्यांचं म्हणणं स्वीकारून सभागृहाने सामंजस्य ठेऊन ते स्वीकारावे असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितल्यावर यावर पडदा टाकण्यात आला. ML/ML/MS