देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे.. खरे भारतीयत्व….!

 देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे.. खरे भारतीयत्व….!

पुणे, दि २०: महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज कात्रज येथील, राजीव गांधी यांच्या पुतळ्यास डॉ. सबनीस व मान्यवरांचे हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज झाला, त्यावेळी डॉ.  सबनीस बोलत होते. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की धर्मनिरपेक्षता भारत देशाचा आत्मा असून त्याच तत्त्वाच्या आधारे आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. राजीव गांधी यांनी त्यासाठी दिलेले योगदान संस्मरणीय आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास दादा पवार होते. ते म्हणाले की आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधींचे मोठे योगदान असून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करणे व दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. ते पुढे म्हणाले की निष्ठावान काँग्रेसजन गोपाळ तिवारी यांनी पुण्यात दिवंगत पंतप्रधान स्व लाल बहादूर शास्त्री आणि स्व राजीव गांधी यांचे पुतळे उभे करून त्यांची स्मारके निर्माण केली ती सर्वांना प्रेरणा देणारी आहेत.
राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख आणि प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. ‘डीजीटल इंडीया’चा पाया भरणी राजीव गांधी यांनी त्याचवेळी केल्याने कोरोना सारख्या संसर्गजन्य काळात ही भारत थांबला नाही व ‘वर्क फ्रॅाम होम’ माध्यमातून विकास चक्र चालू राहिले.
उपस्थित मान्यवरांना शाल, तुळशीचे रोप व राष्ट्र ऊभारणीत महाराष्ट्राचे योगदान (धनंजय बिजले लिखित) पुस्तक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीकांत शिरोळे, राजीव जगताप, बाळासाहेब मारणे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सुभाष थोरवे, उद्यान अधीक्षक डॅा जाधव, नंदकुमार पापळ, भोला वांजळे, राजेंद्र खराडे, आबा जगताप, संजय अभंग, ॲड फैयाज शेख, रमेश सोनकांबळे, धनंजय भिलारे, नरसिंह अंदोली, गणेश मोरे, बाळासाहेब बाणखेले, सुभाष जेधे, महेश अंबिके, ॲड संतोष जाधव, ॲड स्वप्नील जगताप, शंकर शिर्के, अशोक काळे, राजेश सुतार, विकास दवे, सौ मनीषा फाटे, मारुती पानसरे, इत्यादी उपस्थित होते. ॲड.  फैयाज शेख यांनी आभार प्रदर्शन केले KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *