भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ही हिंदुस्थानातील एक नंबरची युनियन
आमदार भाई जगताप यांचे प्रतिपादन

मुंबई प्रतिनिधी
भारतीय कामगार कर्मचारी महासंघ हे कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन असून ही हिंदुस्थानातील एक नंबरची युनियन असल्याची माहिती युनियनचे सेक्रेटरी आमदार भाई जगताप यांनी बांद्रा येथील युनियनच्या 36 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिली.ते पुढे म्हणाले कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली आमची ही एकमेव युनियन असून आमची ही युनियन कधीच प्रायवेट लिमिटेड कंपनी होणार नाही. माझगाव डॉक या सरकारी स्थापनेबरोबर कामगारांचा 28 वर्षे करार झाला नव्हता. हा करार पहिल्यांदा माझ्या युनियनने केला. माझगाव डॉक या सरकारी कंपनी बरोबर कामगारांचा करार करणारी पहिली युनियन भारतीय कामगार कर्मचारी महासंघ असल्याचा मला अभिमान आहे.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने आतापर्यंत कामगारांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महासंघाने अनेक खस्ता खाल्ल्या. प्रसंगी न्यायालयातही गेलो परंतु अनेक कामगारांना परमानंट करून घेण्याचा श्रेय आमच्या युनियनला जाते. आमची युनियन हॉस्पिटल क्षेत्रात, हॉटेल क्षेत्रात आणि इतरही कामगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नावलौकिक गाजवत असून कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन ही एकमेव असून त्यामुळेच ही युनियनचा कार्यकाळ असाच 37 वर्षे यशस्वीपणे सुरूअसल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते दिलीप दादा जगताप यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषणातून दिली. या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींचा तसेच उत्कृष्ट कामगारांचा आमदार भाई जगताप यांच्या हस्ते औद्योगिक शांतता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी कामगार मंत्री हुसेन दलवाई यांनी कामगारांच्या प्रति आपल्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमात भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अनंत जाधव, सदाभाई चव्हाण, कोषाध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष सुधाकर सावंत, रवींद्र नेमाडे, उमीद एक कोशिश या संस्थेच्या संचालिका तेजस्विनी जगताप, मनाली जगताप आणि मोठ्या संख्येने कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.