सरकारची Bharat Taxi सुविधा – जाणून घ्या भाडे

 सरकारची Bharat Taxi सुविधा – जाणून घ्या भाडे

मुंबई, दि. १० : नागरीकांना स्वस्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या मदतीने ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवीन कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भाडे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा ट्रॅफिकची गर्दी, हे भाडे कधीही बदलणार नाही. या सेवेमुळे प्रवाशांना रास्त दरात टॅक्सी सेवा मिळेल तर दुसऱ्या बाजूला चालकांना त्यांच्या कामाचा संपूर्ण मोबदला मिळेल.

भारत टॅक्सीमध्ये ‘फिक्स्ड फेअर’ सिस्टम असेल. म्हणजे तुम्ही जेवढ्या अंतराचा प्रवास कराल, तेवढेच भाडे द्यावे लागेल. या टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीच्या 4 किलोमीटरसाठी तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 12 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर 23 रुपये दर असेल. जर तुमचा प्रवास 12 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी फक्त 18 रुपये आकारले जातील.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *