भारत बायोटेक ने जाहीर केली कोरोनाच्या नेझल लशीची किंमत

 भारत बायोटेक ने जाहीर केली कोरोनाच्या नेझल लशीची किंमत

मुंबई,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक पातळीवर कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला असताना भारत सरकारही कोरोना प्रतिबंधासाठी सज्ज झाले आहे. देशांतील बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याने भारताला याचा धोका कमी संभवतो असे असले तरीही अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून नाकाद्वारा घेण्यात येणारी प्रतिबंधात्मक नेझल नस भारत बायोटेक द्वारा उपलब्ध करण्यात आली आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधात्मक नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. INCOVACC या लसीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. भारत बायोटेकने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसंच सरकारी रुग्णालयात या लसीची किंमत ३२५ आकारण्यात येणार आहे.

ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. तसंच ही लस सर्वप्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तींनी दोन डोस घेतले आहेत त्यांना ही लस उपलब्ध होईल.

रिपोर्ट्सनुसार ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे ती लोक INCOVACC ही लस घेऊ शकतात. या लसीचा वापर बुस्टर डोस म्हणून केला जाईल. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीचे भरपूर फायदे आहेत. करोनाचा विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे ही लस नाक आणि श्वसन मार्गाचे रक्षण करते.

नेझल लस आजपासून CoWIN ॲपवर उपलब्ध झाली आहे. तुम्ही CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करून नेझल लसीसाठी नोंदणी करू शकता.

SL/KA/SL

27 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *