बोगस बियाणे विक्रेत्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके

 बोगस बियाणे विक्रेत्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. Bharari squads in every district for bogus seed sellers

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.

ML/KA/PGB
13 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *